आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरची अमानुष हत्त्या या घटनेचा निषेध



तळेगाव दाभाडे :  दि.१६ (प्रतिनिधी) येथील एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कलकत्ता येथील आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरची अमानुष हत्त्या या घटनेचा निषेध म्हणून  वैद्यकीय महाविद्यालय परिसर व तळेगाव शहरामध्ये  कँडल मार्च काढला होता. यावेळी ८०० ते ९०० विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.

कँडल मार्च नंतर विद्यार्थ्यांनी त्यांचे या घटनेबद्दल तीव्र मनोगत व्यक्त केले व डॉ. संध्या कुलकर्णी प्राचार्य यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. या कँडल मार्च  साठी संस्थेचे  वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी, समन्वयक डॉ तुषार खाचणे, प्राचार्या डॉ. संध्या कुलकर्णी,   कार्यकारी संचालक डॉ. विरेंद्र घैसास, कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे यांनीही सहभाग घेतला होता.


जाहिरात व बातमीसाठी संपर्क
डॉ. संदीप गाडेकर 
 संपादक
 मोबाईल नंबर 820 818 50 37

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश