माईर्स एमआयटीचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय येथे कानाच्या शस्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेत ४७ डॉक्टरांचा सहभाग

 


तळेगाव दाभाडे येथे माईर्स एमआयटीचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या कान,नाक,घसा व शरीररचना शास्त्र विभागाच्या वतीने दिनांक ०२ व ०३ ऑगस्ट रोजी टेम्पोरल बोन डीसेक्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भारतामधील विविध भागातून आलेल्या ४७ हून अधिक तज्ञ डॉक्टरांनी या कॅडेव्हरीक डिसेक्शनद्वारे प्रशिक्षण घेतले अशी माहिती संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर सुचित्रा नागरे यांनी दिली. 

यावेळी कार्यशाळा डायरेक्टर डॉ. संतोष माने, डॉ. देवदत्त कोटणीस, डॉ. शशांक वेदपाठक, डॉ. संतोषकुमार राजामणी,  डॉ. विवेक निर्मले, डॉ. पूनम खैरनार, डॉ. कमोलिका रॉय व पुणे शहरातील सुप्रसिद्ध कान, नाक, घसा तज्ञ डॉ. अनिकेत लाठी, डॉ. प्रसून मिश्रा, डॉ. विनोद शिंदे, डॉ. परमानंद चव्हाण यांनी प्रशिक्षण दिले.

तसेच, डॉ. सायली गोरेगांवकर, डॉ. अक्षया सुंदरी यांनी या कार्यशाळेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला व सहभागी डॉक्टरांना प्रशिक्षण दिले. 

पदव्युत्तर विद्यार्थी व इंटर्न डॉक्टर यांनीही या कार्यशाळेमध्ये आपला सहभाग नोंदवला. 

टेम्पोरल बोन डिसेक्शन कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे, कार्यकारी संचालक डॉ. वीरेंद्र घैसास, प्राचार्या डॉ. संध्या कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण महेशगौरी, समन्वयक डॉ. तुषार खाचणे यांनी नियोजकांचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास