व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये दहीहंडी उत्साहात



लोणावळा दि. 27 (प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये दि.२६-०८-२०२४ रोजी दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ.मृणालिनी गरवारे व कार्यवाहक डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाहक श्री.विजय भुरके, गव्हर्निंग कौन्सिलचे मेंबर श्री.भगवान आंबेकर,ॲड. संदीप अगरवाल व श्री.नितीन गरवारे, श्री.स्वप्नील गवळी यांच्या प्रेरणेने महाविद्यालयात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला..
                    कार्यक्रमाची सुरवात श्रीकृष्णाच्या पूजनाने झाली.त्यानंतर श्रीकृष्णाष्टकाम स्तोत्राचे पठन करण्यात आले . महाविद्यालयातील प्रो. मनीषा कचरे यांनी विध्यार्थ्यांना श्रीकृष्णजन्म याविषयी  माहिती सांगितली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व  विद्यार्थ्यांनी दहीहंडीस सलामी दिली. विशेषतः या कार्यक्रमात मुलींचाही सहभाग होता यावेळी मुलींनी व मुलांनीही श्रीकृष्णाच्या गाण्यावर नुत्य सादर केले. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मनोसक्त आनंद घेतला.
                   द्वितीय,तृतीय व शेवटच्या वर्षातील मुलांनी मिळून थर रचून दहीहंडी फोडली. विध्यार्थ्यांना गोपाळकाला वाटप करून कार्याक्रमची सांगता झाली. या वेळी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर, महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. हरीश हरसुरकर , प्रो. हुसेन शेख, प्रो.सोनी राघो ,प्रो. सायली धरणे व व रोहित जगताप यांचे  मोलाचे सहकार्य लाभले.



            कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख नेहा शाह, महाविद्यालयातील प्रा.प्रिती चोरडे, प्रा.प्राणेश चौहान,प्रा. मनीषा कचरे, प्रा.किरण शारीकर, प्रा.रश्मी भुंबरे, प्रा.श्रुती सुखधान, प्रा.तनुजा हुलावळे,प्रा.सुनिल परगे, प्रा.नम्रता जंगम, प्रा.प्रियांका सातपुते, प्रा.अमिषा नाईक,  श्री. पराग मराठे,  सौ. स्नेहल कुटे, श्री नंदू ठाकर , श्री.रघुनाथ शेडगे ,श्री किशोर देशमुख, श्री गणेश खरमाटे तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


बातमी व जाहिरातीसाठी संपर्क
डॉ. संदीप गाडेकर
संपादक 
मो. 820 818 50 37

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश