रूपाली अशोक गवळी
उपशिक्षिका, जिल्हा परिषद शाळा हिंजवडी
मुले ही आपल्या भारताचे भविष्य आहेत. हेच भविष्य सुरक्षित, यशस्वी असलेच पाहिजे.जेव्हा हे भविष्य सुरक्षित व यशस्वी होईल तेव्हा मुले भविष्याचा वेध घेत आनंदी, प्रेरणादायी, मूल्याधिष्ठित व अभ्यासू वृत्तीने जगण्याचा विचार करून योग्य मार्गाने जातील. मुलांना असे पोषक वातावरण देणे पालकांचे, शिक्षकांचे कर्तव्य आहे. शिक्षण म्हणजे नुसतेच शिकणे नाही किंवा वर्षभरात नेमून दिलेला अभ्यासपूर्ण करून घेणे नव्हे, तर शिक्षण म्हणजे चारित्र्याचा, चांगुलपणाचा विकास तसेच भविष्यातील यशाकडे जाण्याचा एक प्रवास आहे. हा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी घरात पालकांनी व शाळेत शिक्षकांनी विविध उपक्रम करण्याची, नवनवीन प्रयोग करण्याची संधी प्राप्त करून देण्याची गरज निर्माण झालेली आहे, प्रभावी व फलदायी शिक्षणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्वच मुले एकाच ध्येयाकडे जाण्यासाठी प्रवास करणे किंवा अमुक योग्य किंवा अयोग्य आहे म्हणजेच शिक्षणाचे किंवा शिक्षणाचे मुख्य ध्येय म्हणजे गुण मिळवणे नाही तर सर्व क्षमतांचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे मुलांमध्ये माणुसकी, समानुभूतीची भावना निर्माण करणे, आपला समाजाला कसा उपयोग होईल यासाठी स्वतःला तयार करणे हे देखील शिक्षणाचे ध्येय असावे .कोणतेही मूल रिकाम्या डोक्याने मूल जन्माला आले नसतेच प्रत्येक मूल वेगळे असते प्रत्येक मुलामध्ये एखादे कौशल्य किंवा क्षमता उच्च कोटीच्या असतातच, याच क्षमता पालकांनी ओळखून त्यावर लक्ष केंद्रित करावे लागते. एखाद्या मुलामध्ये खेळाचे कौशल्य अधिक असते म्हणजेच त्याची खेळातील क्षमता किंवा बुद्धिमत्ता ही उच्च कोटीची असते. हेच इतर कलांच्या बाबतीतही लागू पडते. म्हणूनच मुलांमधील याच क्षमता ओळखून त्यांना संधी देणे त्यांना उभरण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. म्हणूनच पालकांनी आपल्या पाल्यावर आपल्या अपेक्षांच्या ओझोनल न लाजता त्याच्या आवडीनुसार क्षेत्र निवडण्यास त्याला प्रोत्साहन देणे स्वातंत्र देणे गरजेचे आहे. शाळांमध्ये प्रत्येक दृष्टिकोनातून विचार करून मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात संदीप उपलब्ध करून देणे व पुढे येण्यास मदत करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्राची माहिती करून देणे त्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींची माहिती करून देणे ओळख करून देणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्याच्या आवडत्या विषयाची निवड करण्यासाठी स्वातंत्र्य देणे व त्या विषयात नैपुण्य मिळवण्यासाठी त्याला त्या विषयाशी संबंधित अधिकाधिक माहितीचा स्त्रोत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे अध्ययन सुखकर व प्रभावी होण्यासाठी वर्गात फक्त पाठांतरावर भर न देता कृतीयुक्त अध्ययनावर भर देणे आवश्यक आहे. यासाठी नावीन्यपूर्ण व आकर्षक शैक्षणिक साधनांचा वापर करणे, वेगवेगळे शैक्षणिक अनुभव देणे आवश्यक असते. यामुळे मुलांच्या संकल्पना अधिक दृढ होतील व कायमच्या आठवणीत राहतील. त्यामुळे मुलांची शिक्षण सुखकर होईल. विद्यार्थ्यांच्या क्षमता , बांधिलकी व कामगिरी यावर पुन्हा अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. अभिव्यक्तीला वाव देणारे प्रसंग उभे करणे महत्त्वाचे आहे. अशा कृतीयुक्त अध्ययनातून आनंद व आनंदातून पुन्हा अध्ययन ही काळाची गरज आहे.
@ रूपाली अशोक गवळी
उपशिक्षिका, जिल्हा परिषद शाळा हिंजवडी
मो. 9096397339
जाहिरात व बातमीसाठी संपर्क
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो. 8208185037
Comments
Post a Comment