दुर्बिणीतून कानाच्या शस्त्राक्रियेवरील अंतरराष्ट्रीय SEOCON 2024 परिषद- तळेगाव दाभाडे येथे

 


तळेगाव दाभाडे दि. २३ (प्रतिनिधी)मावळच्या इतिहासात प्रथमच डॉ. मुबारक खान, डॉ. शिरीन खान आणि डॉ. सपना परब आणि त्यांची टीम हे दुर्बिणीतून कानाच्या शस्त्राक्रियांवरील अंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन ३0 ऑगस्ट २०२४ ते १ सप्टेंबर २०२४ या कालावधीत करणार आहेत. डॉ. खान आणि डॉ. सपना परब यांनी मावळ परिसरात गेल्या २ दशकांपासून दुर्बिणीतून बिना चीर टाका कानाच्या शस्त्रक्रियेचे तंत्र विकसित केले आहे.

  त्यांनी या शास्त्रक्रियेसाठी अनेक उपकरणे विकसित केले आहे आणि त्यांचे पेटंट घेतले आहेत. त्यामुळे या तंत्राचा उपयोग करून कमीत कमी खर्चात दुर्बिणीतून बिना चीर – टाका उच्च, किफायतशीर शस्त्राक्रिया केले जातात. 

सुश्रुत ई. एन. टी. हॉस्पिटल आणि डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेज – पिंपरी यांच्या सहकार्याने दुर्बिणीतून कानाच्या शस्त्राक्रिया करण्याचे तंत्रज्ञान शिकवण्यासाठी पहिल्या अंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. कानाच्या विविध शस्त्राक्रिया दुर्बिणीतून बिनाटाका शस्त्रक्रिया माफक दरात केल्या जाणार आहेत. कानातून पू येणे, कानाचे हाड सडणे तसेच ऐकू न येणे अश्या विविध आजारावर शस्त्रक्रिया केले जातील. 

या परिषदेमध्ये मार्गदर्शनासाठी कोपेनहेगेन, डेन्मार्कचे - Mads Sølvsten Sørensen, दुबई, अमेरिका वरून - Prof. Muaaz Tarabichi, जयपूर, राजस्थानचे- डॉ. सतीश जैन  हे दिग्गज कान, नाक, घसा तज्ञ येणार आहेत. या परिषदेमध्ये देश- विदेशातील ३०० हून अधिक कान, नाक, घसा तज्ञ नवीन शस्त्रक्रियेचे तंत्र शिकण्यासाठी उपस्थित असतील. 

तळेगाव दाभाडे येथील पहिलीच अंतरराष्ट्रीय कानाच्या शस्त्रक्रियेवरील ही परिषद आहे. येथे डॉ. खान आणि डॉ. परब हे त्यांचे तंत्र जगाला दाखवून देतील. सर्व शस्त्राक्रिया सुश्रुत ई. एन. टी. हॉस्पिटल तसेच डी.वाय.पाटील मेडीकॅल कॉलेज-पिंपरी येथून थेट प्रक्षेपणाद्वारे The Fern Residency –वडगाव येथे दाखवण्यात येतील. 

या मावळातील प्रतिष्ठित अश्या प्रथमच होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी सुश्रुत ई. एन. टी. हॉस्पिटलचा सर्व स्टाफ तसेच डी. वाय. पाटील मेडीकॅल कॉलेज – पिंपरी कान, नाक, घसा विभागाचे प्रोफेसर जी.डी. महाजन, प्रोफेसर विनोद शिंदे, प्रोफेसर मयूर इंगळे, प्रोफेसर परेश चव्हाण आणि त्यांची सर्व सहकारी यांचे सहकार्य लाभणार आहे. 

कानाच्या गरजू रुग्णांनी संपर्क साधावा.
सुश्रुत ई. एन. टी. हॉस्पिटल- मोबाईल- ९५२७५४८६८३, ७०५७५८४५७९,  ७७७३९३०९५६, 
दुरध्वनी क्रमांक - ०२२११४-२९५५०७.
कान, नाक, घसा विभाग - डी. वाय. पाटील मेडीकॅल कॉलेज- पिंपरी.

जाहिरात व बातमीसाठी संपर्क 
डॉ. संदीप गाडेकर 

संपादक 

मोबाईल 820 818 50 37


Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश