महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून कर्करुग्णांना मिळणार अत्याधुनिक टोमोथेरेपी उपचारप्रणालीव्दारे उपचार


 तळेगावच्या टिजीएच - ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये शासकिय योजनेतंर्गत टोमोथेरपी उपचारप्रणालीव्दारे उपचार देणारे महाराष्ट्रातील पहिले रूग्णालय

तळेगाव, सप्टेंबर १०, २०२४ : टिजीएच - ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये MJPJAY (महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य) योजनेतंर्गत मोफत कॅन्सर उपचार सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. कर्करोगाच्या रुग्णांवर रेडिओथेरपीसाठी अत्याधुनिक टोमोथेरपी या अद्ययावत उपचारप्रणालीचा या योजनेत समावेश झाला असून या आर्टीफिशियल इंटेलिजेन्सचा समावेश असलेल्या या तंत्राने कर्करोग झालेल्या अवयवावर ३६० च्या कोनामध्ये वि-किरण सोडून उपचार केले जातात. यामुळे रुग्णांवर अधिक परिणामकारकरित्या उपचार करणे शक्य होत आहे. या योजनेच्या शुभारंभ स्थानीक आमदार श्री.सुनिल शेळके यांच्याहस्ते करण्यात आला तर याप्रसंगी टीजीएच – ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. उदय देशमुख, श्री गणेश खांडगे (प्रसिडेंट-टिजीएच), श्री शैलेश शाह (अध्यक्ष-टिजीएच), डाँ.सत्यजीत वढावकर( सचिव- टिजीएच), डाँ. सचिन देशमुख, कार्यकारी संचालक, प्रताप राजेमहाडीक, संचालक आणि डाँ.संतोष साहू यांच्यासह सर्व डाँक्टर्स उपस्थित होते.

नागरिकांना गंभीर आजारांवरील दर्जेदार उपचार पूर्णतः मोफत उपलब्ध करवून देणे हा महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यात सध्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवली जाते. तळेगाव येथील  टिजीएच - ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर येथे आता रुग्णांना या योजनेचा लाभ घेता यणार असून सर्व रेशन कार्ड धारकांना या योजनेतंर्गत मोफत उपचार पुरविले जातील.

सर्व सामान्यांनाही अद्ययावत कर्करोगावरील उपचार किफायतशील दरात तेही कुठेही मोठ्या शहरात न जाता जवळ उपलब्ध व्हावेत यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो.  आता महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून कर्करोगाशी संबंधीत विविध उपचार तेही अतिशय अद्यायवत तंत्रज्ञान असलेली उपचारप्रणाली आम्ही आमच्या रूग्णालयात उपलब्ध करू शकलो याचे खुप समाधान आहे. कर्करोगाचे सर्व उपचार आणि निदान एकाच ठिकाणी होतील. भारतामध्ये दिवसेंदिवस कर्करुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टीजीएच-ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरद्वारे तळेगाव येथे कॅन्सरसाठी एक विशेष ओपीडी आणि केमोथेरेपी वॉर्डही उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शहराकडे धाव न घेता आपल्या परिसरातच उत्तमोत्तम सेवा पुरविण्याचा प्रयत्न सेंटरच्या माध्यमातून आम्ही करत असल्याचे टीजीएच – ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री.उदय देशमुख यांनी व्यक्त केली.

या शुभारंगाप्रसंगी बोलताना आमदार सुनिल शेळके म्हणाले की, “टीजीएच आँन्को लाईफ कँन्सर रूग्णालयाच्या माध्यमातून व्यवसाय न पाहता सामाजिक बांधिलकी जपत रूग्ण सेवा हाच एकमेव उद्देश समोर ठेवून सेवा दिली जाते आणि आज या योजनेच्या माध्यमातून समाजातील गरीब आणि गरजू रूग्णांना आता कँन्सर उपचारासाठी पुणे अथवा मुंबईसारख्या शहरांत न जाता तालुक्यातच उपचार मिळतील आणि त्यांचा त्रासही कमी होईल त्यामुळे ही अतिशय समाधानकारक बाब असल्याने मी या रूग्णालयातील व्यवस्थापक मंडळाचे आभार मानतो. तसेच, प्रत्येक गरजूला सर्वतोपरी योजनेचा लाभ मिळावा यासाठी मी स्वता रूग्णालयाच्या खांदयाला खांदा लावून प्रयत्न करेन अशी ग्वाही देतो.”

जाहिरात व बातमीसाठी संपर्क 
डॉ. संदीप गाडेकर 
संपादक 

मोबाईल नंबर 820 818 50 37


Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश