मुलींनी निर्भय बनले पाहिजे- कृष्णकुमार गोयल

 

पुणे दि.14 (प्रतिनिधी) खडकी शिक्षण संस्थेच्या पाच दिवसीय गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळी ते बोलत होते.. निर्भय कन्या हा ज्वलंत विषय यावर्षी देखाव्यात सादर करण्यात आला होता.मुलगी ही कुटुंबाचा प्रमुख घटक असून.. सामाजिक उन्नतीचा पाया तिच्या कडूनच रचला जातो.. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला न घाबरता येणाऱ्या आव्हानाला सामोरे जात तिने निर्भयतेने वावरले पाहिजे असेही ते म्हणाले..

      या प्रसंगी सहसचिव सुरजभान अगरवाल, संचालक राजेंद्र भुतडा महाविद्यालयाचे प्राचार्य सहसचिव डॉ. संजय चाकणे , गजानन आहेर, सरिता नायर, घाडगे, शरदचंद्र बोटेकर, नवनाथ जाधव, महादेव रोकडे,मंगेश दळवी आणि संस्थेतील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

संस्थेच्या सर्व विभागांनी मिळून सालाबाद प्रमाणे ढोल लेझीम, पथनाट्य, दिंडी अशा अनेक कला अविष्कारानी भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते..

     ज्ञान.. बुद्धी ..आणि शक्तीचे स्त्रोत असणाऱ्या श्री. गणराया कडून  सदसद विवेक बुद्धीने आपला सर्वांगीण विकास करून घ्यावा असे प्रतिपादन सहसचिव डॉ. संजय चाकणे यांनी यावेळी केले..

    खडकी शिक्षण संस्थेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या भव्य मिरवणुकीचे परिसरातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करीत आपला सहभाग नोंदविला.


जाहिरात व बातमीसाठी संपर्क 

डॉ. संदीप गाडेकर 
संपादक 
मोबाईल 820 818 50 37

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश