पेन्शनच्या लढाईत कायम शिक्षकांबरोबर राहणार- आमदार संजय जगताप यांचे प्रतिपादन, सासवडमध्ये जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार संपन्न

 


सासवड दि. 15 (प्रतिनिधी) 

आमदार मंडळी निवडणूक आल्यावर शिक्षकांच्या जवळ येतात, निवडणूकांनंतर विचारत नाहीत, मात्र आमदार संजय जगताप हे एकमेव असे आहेत ज्यांनी वेळोवेळी जूनी पेन्शन योजना, शिक्षकांचे प्रश्न विधीमंडळात मांडले. शिक्षकांविषयी तळमळ आणि शिक्षणाबाबत प्रेम असणारे आमदार म्हणून आमदार संजय जगताप यांची ओळख असल्याचे याप्रसंगी अनेक वक्त्यांनी सांगितले.

समाज, देश, राष्ट्र घडविण्याचे काम शिक्षक करीत आहेत. सर्व प्रगत देशांत शिक्षकांना मोठी प्रतिष्ठा असून शिक्षणावर सर्वाधिक खर्च केला जातो. मात्र आपल्या देशातील शासन शिक्षकांकडून कोरोना काळातील तसेच निवडणूकांची कामे अशा सर्व भूमिका बजावून घेत असूनही शिक्षकांचे जूनी पेन्शनसारख्या अनेक प्रश्नांची सोडवणूक होताना दिसत नाही, शिक्षकांना पेन्शनची शाश्वतता, संचयती महत्त्वाची असून जूनी पेन्शनच्या लढ्यात कायम शिक्षकांबरोबर राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार संजय जगताप यांनी केले. रविवारी सासवड येथे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा शिक्षिका संघ आणि जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी आ. संजय जगताप यांनी, शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षकांच्या मागण्यांसाठी कायम लढत राहणार असल्याचे सांगितले. 


 जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, माजी जि प अध्यक्ष विजय कोलते, सतिश उरसळ, शिवकृपा पतपेढीचे अध्यक्ष गोरख चव्हाण, शिक्षकनेते के एस ढोमसे, जी.के थोरात, प्रा. संदीप टिळेकर यांनी आपल्या मनोगतातून, शासनाने शिक्षकांना शिकविण्याव्यतिरिक्त दिलेली इतर कामे,अनेक दिवसांपासूनच्या रिक्त जागा याबाबत चर्चा करीत शिक्षकांनी आपले ज्ञानदानाचे कार्य असेच सुरू ठेवावे, मुलांचा बौद्धिक विकास माध्यमिक शिक्षणापर्यंतच चांगला होतो, आणि याकाळातील संस्कार महत्त्वाचे ठरतात असे सांगितले. संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव ताकवले यांनी प्रास्ताविकातून जूनी पेन्शन योजना आणि इतर अडचणी मांडल्या. तालुकाध्यक्ष दत्तात्रय रोकडे यांनी सुत्रसंचलन केले. 


याप्रसंगी राज्य प्रतिनिधी व जिल्हा उपाध्यक्ष स्नेहलता बाळसराफ, शिक्षकनेते शिवाजीराव कामथे, कुंडलिक मेमाणे, सुरेश संकपाळ, सचिन दुर्गाडे, रामप्रभू पेटकर, पंकज घोलप, तानाजी झेंडे, दत्तात्रय रोकडे, मुरलीधर मांजरे, राजेंद्र पडवळ, जालिंदर घाटे, स्वाती उपार, माधुरी काळभोर, दत्तात्रय अरकडे, सविता ताजणे यांसह पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व टि.डी.एफ., शिक्षिका संघ व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


(पुरस्कार विजेते शिक्षक बंधू भगिनी व मान्यवर)


जाहिरात व बातमीसाठी संपर्क 
डॉ. संदीप गाडेकर 
संपादक 
मोबाईल नंबर 820 818 50 37


Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश