"खडकी बोपोडी परिसरातील युवकांना कौशल्यावर आधारित शिक्षण मिळणार ." - कृष्णकुमार गोयल


(आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन करताना कृष्णकुमार गोयल (मध्यभागी) -डावीकडून  कार्यालय अधिक्षक लक्ष्मण डामसे ,ज्ञानेश्वर मुरकुटे,रमेश अवस्थे, आनंद छाजेड,प्राचार्य डॉ.संजय चाकणे,अर्जुन मुसमाडे व डॉ.शीतल रणधीर)

 खडकी: दि 20 (प्रतिनिधी) - 'खडकी बोपोडी,दापोडी,येरवडा, परिसरातील  हजारो युवकांना कौशल्यावर आधारित शिक्षण मिळेल आणि कौशल्यधिष्ठित शिक्षणाच्या आधारे रोजगार उपलब्ध होईल' असे प्रतिपादन खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी केले.

 टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमात गोयल  बोलत होते . 

 केंद्रशासन प्रणित 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे केले. या प्रसंगी संपन्न झालेल्या कार्यक्रमप्रसंगी बोलत  गोयल होते.

पंतप्रधान मोदी यांनी युवकांशी संवाद साधताना सांगितले की, या योजनेमुळे महाराष्ट्रातील किमान दोन लाख युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

  महाविद्यालयाचे प्राचार्य व सहसचिव डॉ.संजय चाकणे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून  प्रास्ताविक केले. यावेळी डॉ.चाकणे म्हणाले की, शासनाने या केंद्राला मान्यता दिल्याने आपले महाविद्यालय पंतप्रधानाच्या यादीत समाविष्ट झाले आहे याचा आनंद व अभिमान वाटतो. डॉ.शीतल रणधीर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे  सचिव श्री.आनंद छाजेड, सहायक आयुक्त सूरज महाजन ,दत्ताजी गायकवाड, काशिनाथ देवधर, ॲड. अजय सूर्यवंशी,रमेश अवस्थे, राजेंद्र भुतडा ज्ञानेश्वर मुरकुटे, शरद जाधव,सुधीर फेंगसे ,फ्रान्सिस डेव्हिड हे संस्था पदाधिकारी उपस्थित होते. आभार सचिव आनंद छाजेड यांनी मानले.


जाहिरात व बातमी संपर्क 
डॉ. संदीप गाडेकर 
संपादक 
मोबाईल 820 818 50 37

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश