मावळ तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्था तळेगाव दाभाडे पतसंस्थेची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न




तळेगाव दाभाडे दि. २३ (प्रतिनिधी) मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा तळेगाव दाभाडे येथील ॲड पु. वा. परांजपे विद्या मंदिर येथील सभागृहात संपन्न झाली यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संतोष भेगडे उपस्थित होते.

 या कार्यक्रमासाठी पतसंस्थेचे संस्थापक विलास भेगडे, जेष्ठ सल्लागार भाऊसाहेब आगळमे, मुख्य प्रवर्तक धनंजय नांगरे,पतसंस्थेचे अध्यक्ष भारत काळे, उपाध्यक्ष अशोक कराड, कार्यकारी संचालक राम कदमबांडे, खजिनदार भाऊसाहेब खोसे यांच्यासह संचालक सोपान असवले, सुमन जाधव, दत्ता गायकवाड, विजय वरघडे, अमोल जाधव आदी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ज्या सभासदांनी अविरतपणे शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना मावळ तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेसाठी योगदान देऊन पतसंस्था वाढीसाठी व प्रगतीसाठी प्रयत्न केले आहेत निवृत्त सभासदांचा सन्मान  करण्यात आला.

 मान्यवरांच्या उपस्थितीत सभासदांच्या पाल्यांनी विविध क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करत यश संपादन केले त्यांचा सन्मान  करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे कार्यकारी संचालक राम कदमबांडे, सुत्रसंचलन सुमन जाधव व वैशाली कोयते यांनी केले तर आभार संचालक सोपान असवले यांनी मानले

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश