पुणे दि. १४ (प्रतिनिधी) शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाने आयोजित केलेल्या गुणवंत शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळ्यात शिक्षक हाच समाजाचा खरा आदर्श असून येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांनी टेक्नोसॅव्ही बनून बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये अपडेशन केले पाहिजे असे मत पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व म. फुले सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी राज्याचे मा. शिक्षण संचालक डॉ.दिगंबर देशमुख, लेखक व शिक्षणतज्ञ यशराजजी पारखी, महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे राज्य कार्याध्यक्ष जी. के. थोरात,विश्वस्त के.एस. ढोमसे, पुणे विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव कामथे, पुणे विभाग माध्य.चे सचिव सचिन दुर्गाडे यांच्या हस्ते शिक्षकांना शाल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
संघटनेच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार यांना जाहीर करण्यात आला त्यांच्या मानपत्राचे वाचन प्राचार्य राज मुजावर यांनी करून त्यांच्या कार्याची ओळख उपस्थितांना करून दिली. या सोहळ्यात पुणे शहरातील शिक्षण खात्यातील 04 अधिकारी,06 मुख्याध्यापक, 05 जुनि. कॉलेज प्रा. 41शिक्षक व 4 शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण 60 मान्यवरांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते गौरविण्यात आले.
आजच्या काळामध्ये शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल झाले असल्यामुळे बदलत्या काळानुसार विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून अध्यापन अध्ययन पद्धतीत सुधारणा घडवून आणण्याचे आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त.केले राष्ट्र निर्मितीमध्ये व राष्ट्राच्या विकासामध्ये शिक्षकांचा मोलाचा सहभाग असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. पीडीसीसी बँकेच्या वतीने शिक्षकांना अल्प व्याजदरामध्ये शैक्षणिक व गृह कर्ज उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले.
मान्यवरांच्या मनोगतामध्ये पुणे विभाग अध्यक्ष शिवाजीराव कामथे तसेच राज्याचे विश्वस्त के. एस. ढोमसे, महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष जी.के. थोरात यांनी संघटनेचे महत्त्व पटवून देताना शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून शिक्षकांच्या मध्ये देशाची सुसंस्कृत पिढी घडवण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे मत व्यक्त करून सर्व सन्माननीर्थींना शुभेच्छा दिल्या. डॉ. यशराज पारखी यांनी मार्गदर्शन करताना व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असून
यांनी आपल्या बहारदार शैलीने उपस्थितांची मने जिंकली तसेच शिक्षक या शब्दाची व्याख्या स्पष्ट करून शिक्षकांच्या प्रती आदरभाव व्यक्त केला.
यावेळी या पुरस्कार सन्मान सोहळ्यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल शिवाजीराव कामथे सर व सौ.कल्पना कोल्हे या दोन्ही परिवाराचा सर्व मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय मनोगता मध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्याचे मा. शिक्षण संचालक डॉ.दिगंबर देशमुख यांनी शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करून संघटना राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी आपल्या जीवनामध्ये अमेरिकेमध्ये घडलेला एक किस्सा सांगून शिक्षकांना समाजामध्ये किती मानाचे स्थान आहे याचे महत्त्व अधोरेखित केले. येणारा काळामध्ये शिक्षकांनी हे महत्त्व टिकवून ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
सर्व पुरस्कारार्थीच्या वतीने मुख्या. अजित माने व शिक्षक संतोष दुर्गाडे यांनी संघटनेचे आभार व्यक्त केले.
यावेळी राज्य लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष जी. के. थोरात, विश्वस्त के. एस. ढोमसे, पुणे विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव कामथे, पुणे विभाग माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन दुर्गाडे,पुणे जिल्हा मुख्या.संघाचे मा. अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, पुणे शहर मुख्या. संघाचे अध्यक्ष सुजित जगताप, पुणे माध्यमिक शिक्षक सह.पतपेढी चे मा. अध्यक्ष विजय कचरे सारथी शिक्षण संस्थेच्या सचिव सौ.मधुरा चौधरी (जगताप), सामाजिक कार्यकर्त्या मनाली ताई झेंडे,विद्या समिती सचिव भानुदास रिठे, मुख्या.महामंडळाचे मा. सचिव शांताराम पोखरकर, जिल्हा माध्य.शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अशोक नाळे उपस्थित होते.
कार्यक्रमाऊ प्रास्ताविक पुणे शहर टीडीएफचे अध्यक्ष संतोष थोरात यांनी केले तर पाहुण्यांची ओळख पुणे विभाग माध्य.शिक्षक संघाचे सचिव सचिन दुर्गाडे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला अध्यक्षा सौ.भारती राऊत व पुणे शहर जुनि. कॉलेजचे सचिव प्रा. अरविंद मोडक यांनी केले. पुरस्कार वितरणाच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता पुणे शहर जुनि. कॉलेज टीडीएफचे अध्यक्ष प्रा. शिक्षकांत शिंदे यांनी पार पाडली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचे आभार महिला उपाध्यक्षा सौ. कल्पना कोल्हे यांनी मानले.
कार्यक्रमाचे आयोजन नियोजन पुणे विभाग टीडीएफ चे अध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव कामथे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर महिला टीडीएफ च्या अध्यक्षा सौ. हर्षा पिसाळ महिला माध्यमिक शिक्षका संघाच्या सचिव डॉ. मंगल शिंदे महिला टीडीएफ सचिव सौ. उज्वला हातागळे, विनाअनुदानित व अंशतः अनुदानित चे अध्यक्ष संजय कांबळे , सोशल मीडिया प्रमुख संतराम इंदुरे, महालिंग कुलाळ, सुरेश शेंडकर सुनील गिरमे, हडपसर विभाग प्रमुख प्रीतम बर्गे, कार्याध्यक्ष भगवान पांडेकर, दत्तात्रेय हेगडकर, अशोक धालगडे, बाळासाहेब इमडे, द्वारकानाथ दहिफळे, दत्तात्रय बनकर, संजय ढवळे, संजय पिंगळे तसेच पुणे शहर टीडीएफ व माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते.
(पुरस्कार प्राप्त शिक्षक बंधू आणि भगिनी)
जाहिरात आणि बातमीसाठी संपर्क
डॉ. संदीप गाडेकर
संपादक
मोबाईल 820 818 50 37
Comments
Post a Comment