(डावीकडून संजय चाकणे , राजेश पांडे, कृष्णकुमार गोयल, आनंद छाजेड, रक्षा खडसे, सपना छाजेड)
खडकी दि.20 (प्रतिनिधी) - या राज्यातील तरुणांनी माय पोर्टल व्हारे विकसित भारत या अभियानात सामील व्हावे.आणि विकसित भारताचे स्वप्न साकारण्याकरता पुढे यावे आणि विकसित भारताचे ब्रँड अँबेसेडर व्हावे,असे आवाहन केंद्रीय क्रीडाडा राज्यमंत्री नामदार रक्षाताई खडसे यांनी केले.पुण्यातील खडकी मधील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात विकसित भारत अँम्बेसेडर युवा कनेक्ट उपक्रमातंर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी महाविद्यालयाच्या आवारात एक झाड आईच्या (एक पेड मां के नाम) या केंद्रशासन प्रणित उपक्रमातंर्गत रक्षा खडसे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले . तसेच त्यांनी महाविद्यालयातील तरुण यु ट्युबरर्सशी संवाद साधला .यावेळी संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी रक्षा खडसे यांनी ,उपस्थित तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. विशेषत: 'माय भारत पोर्टल' विषयी माहिती देऊन यात सर्वांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले. विकसित भारताचा आराखडा शिक्षण ,आरोग्य,कौशल्य,क्रिडा आणि संस्कृती या पाच स्तरांवर आधारित असल्याचे रक्षा खडसे यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय नेमबाज पटु आश्विनी पाटील हिचा सत्कार रक्षा खडसे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
प्रारंभी ना. खडसे याचा श्री.,कृष्णकुमार गोयल यांनी यथोचित सत्कार केला. याप्रसंगी सचिव आनंद छाजेड,व सर्व संस्था पदाधिकारी ,सहायक आयुक्त सूरज महाजन ,शासकीय अधिकारी, आणि संस्थेचे सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वृंद मोठया संख्येने उपस्थित होते. प्राचार्य डॉ संजय चाकणे यांनी सर उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले.या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.नीलेश काळे यांनी आयोजन केले.
डॉ.शीतल रणधीर व प्रा. राजेंद्र लेले यांनी सूत्रसंचालन केले सचिव श्री आनंद छाजेड यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले.
जाहिरात व बातमी संपर्क
डॉ. संदीप गाडेकर
संपादक
मोबाईल 820 818 50 37
Comments
Post a Comment