इंद्रायणी महाविद्यालयामध्ये हिंदी दिवस उत्साहात संपन्न



तळेगाव स्टेशन दिनांक 24 (प्रतिनिधी) इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून डॉ. विपिन पवार पूर्व निदेशक (राजभाषा) रेल मंत्रालय, भारत सरकार, नई दिल्ली चे उपस्थित होते. त्यांचे नाव साहित्यिक, पत्रकार आणि संपादक म्हणून सर्व देशाला माहित आहे. त्यांनी आपल्या अतिथी भाषणामध्ये राजभाषा हिंदी चे महत्व सांगितले. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदीचे स्थान, महत्त्व, सन्मान खूप होत आहे. त्यामध्ये मॉरिशस, अमेरिका, श्रीलंका, फ्रान्स, नार्वे, टोकियो अशा 40 देशांमध्ये हिंदीच्या पाठशाला आहेत. पहिले विश्व हिंदी संमेलन नागपूर मध्ये भरले होते त्याची आठवण करून देऊन त्यामधील काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. हिंदी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आज अनेक क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत हे त्यांनी आवर्जून सांगितले त्यामध्ये शिक्षक, लेखक, अनुवादक, हिंदी निदेशक, रेल्वे, बँक आणि इंटरनेटच्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत व पगार ही समाधानकारक आहे हे आवर्जून सांगितले. शेवटी विद्यार्थ्यांनी त्यांना काही प्रश्न विचारले व त्याचे समाधानकारक उत्तर त्यांनी दिले.



अध्यक्षीय भाषण कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य संदीप भोसले सरांनी ही हिंदी चे महत्व सांगितले व हिंदी भाषेला राष्ट्रभाषा चा दर्जा मिळण्यासाठी हम होंगे कामयाब ची घोषणा केली. हिंदी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. मधुकर देशमुख यांनी प्रास्ताविका मध्ये हिंदी दिवसाचे महत्व सांगून राज्यभाषा, राजभाषा और राष्ट्रभाषा याच्यातील अंतर समजावून सांगितला.

याप्रसंगी इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले, हिंदी विभाग प्रमुख डॉ. मधुकर देशमुख, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. काशिनाथ आडसूळ, हिंदी विषयाचे प्रा. राजेंद्र आठवले, अर्चना पाटील मॅडम, प्रा. प्रसन्न नेने, डॉ. संदीप कांबळे, प्रा. खांडगे, दिसले मॅडम आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र आठवले यांनी केले व आभार अर्चना पाटील मॅडम यांनी केले. हिंदी दिवस साजरा केल्याबद्दल इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदासजी काकडे, सचिव चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश भाई शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे व सर्व विश्वस्तांनी विभागाचे विशेष कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश