नॅक च्या 'अ ' श्रेयांकामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर - कृष्णकुमार गोयल

  ( डावीकडून श्री.आनंद छाजेड राजेंद्र लेले, कृष्णकुमार गोयल , डॉ.संजय चाकणे ,आणि श्री अनिल मेहता)

पुणे दि. ८ (प्रतिनिधी) खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे  नॅक मूल्यांकन दिनांक 30 व 31 ऑगस्ट रोजी पार पडले या मूल्यांकन प्रक्रियेचा निकाल नुकताच नॅक कडून जाहीर करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडल्याचे गोयल यांनी सांगितले.. 

त्यावेळी महाविद्यालयाच्या लौकिकात  भर पडल्याचे गोयल यांनी सांगितले... पुढे ते म्हणाले की मागील पाच वर्ष वर्षात महाविद्यालयाने अभ्यास,  अभ्यासेत्तर व इतर अभ्यासपूरक राष्ट्रीय छात्र सेना, स्पर्धा परीक्षा क्रीडा नेमबाजी या सर्व प्रकारात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आहे. यावेळी त्यांनी प्राचार्य संजय चाकणे व राजेंद्र लेले यांचा सत्कार केला. 

यावेळी बोलताना प्राचार्य संजय चाकणे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले व सर्व क्षेत्रात  विशेषता इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मोठ्या सुधारणा संस्थेने केल्याचे आवर्जून सांगितले. महाविद्यालयाने केलेले संशोधन लिखाण,क्रीडा क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी याचा आढावा घेतला.. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल मेहता सचिव आनंद छाजेड,सहसचिव सुरजभान अगरवाल ,संचालक रमेश अवस्थी, भुतडा, पंगुडवाले, अजय सूर्यवंशी, मुरकुटे, काशिनाथ देवधर आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

अजय सूर्यवंशी यांनी आपल्या भाषणामध्ये सर्वांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.

यावेळी सूत्रसंचालन श्री राजेंद्र लेले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक अर्जुन मुसमाडे यांनी व्यक्त केले.


जाहिरात व बातमीसाठी संपर्क 
डॉ. संदीप गाडेकर 
संपादक 

मोबाईल नंबर 820 818 50 37


Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश