विद्यार्थ्यांनी युद्ध सोडता कामा नये - प्यारा ऑलंपियन विजेते मुरलीकांत पेटकर

 

(डावीकडून ज्ञानेश्वर मुरकुटे, संजय चाकणे, मुरलिकांत पेटकर, राजेश पांडे, कृष्णकुमार गोयल)

पुणे दिनांक 22 (प्रतिनिधी)विद्यार्थी दशे मध्ये असतानाच विद्यार्थ्यांना आपल्या राष्ट्रासाठी  युद्ध आणि देशवासीयांसाठी  होतात्म्य  पत्करलेल्या जवानांचा इतिहास वारंवार मनावर ठसविणे गरजेचे आहे...

खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयामध्ये आयोजित 'विकसित भारत युवा कनेक्ट 'अंतर्गत कार्यक्रमात ते बोलत होते...

   युवकांनी क्रीडा प्रकारात सहभाग घेऊन ऑलम्पिक मध्ये आपल्या देशाचे नाव उज्वल करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले... 

  छात्रशक्ती ही राष्ट्राची संपत्ती असून देशाच्या सेवेसाठी विकासासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे असे संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आपल्या भाषणात म्हणाले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसचिव प्राचार्य संजय चाकणे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्र लेले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव आनंद छाजेड यांनी मानले.

या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना अध्यक्ष राजेश पांडे ,संस्था संचालक अजय सूर्यवंशी, सुरजभान अगरवाल, काशिनाथ देवधर,धीरज गुप्ता,ज्ञानेश्वर मुरकुटे, राजेंद्र भुतडा, सुधीर फेंगसे, फ्रान्सिस डेविड ,रमेश अवस्थी, सपना छाजेड आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आणि  प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती 

कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये अर्जुन मुसमडे, नीलेश काळे, शितल रणधीर, महादेव रोकडे लक्ष्मण डामसे, आदींनी महत्वाची भूमिका पार पाडली.


बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 
डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो. 820 818 50 37


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर