महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या अध्यक्षपदी जी.के. थोरात व कार्यवाहपदी के.एस.ढोमसे यांची प्रचंड बहुमताने निवड: राज्य टीडीएफ च्या पंचवार्षिक निवडणुकीत11/0 नी पॅनलचा दणदणीत विजय

पुणे दि. 27 (प्रतिनिधी)

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीचा सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजीराव  कामथे यांनी दि.08/10/2024 ते 27/10/2024 या कालावधीत जाहीर केला होता. या अनुषंगाने आज अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व ज्युनि.कॉलेज(पी.ए. इनामदार विद्यापीठ, आझम कॅम्पस), पुणे येथे प्रत्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली, या निवडणुकीत एकूण 64%मतदान होऊन जी.के.थोरात यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा प्रचंड बहुमताने विजय झाला.



   यावेळी 11 ते 2 या वेळेत प्रत्यक्ष मतदान होऊन मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजीराव कामथे, सहाय्यक निवडणूक  अधिकारी सागर पाटील (कोकण), आर. आर. पाटील ( जळगाव), इनामदार सर (मुंबई) तसेच मतदान मोजणी अधिकारी प्रा.अरविंद मोडक,सचिन दुर्गाडे,संतोष थोरात यांनी मतमोजणी करून मुख्य निवडणूक अधिकारी शिवाजीराव कामथे यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला व विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आले. मतदान अधिकारी म्हणून संतराम इंदुरे,अशोक देवकते व अशोक धालगडे यांनी काम पाहिले. या निवडणुकीसाठी विशेष तांत्रिक सहाय्य प्रा.शशिकांत शिंदे व पंकज घोलप यांनी केले.



  यानंतर सर्व नवनिर्वाचित सदस्यांची सभा होऊन यामध्ये सर्वानुमते जी.के. थोरात यांची अध्यक्षपदी, नरसु पाटील यांची कार्याध्यक्ष पदी तसेच के.एस. डोमसे यांची  सचिव पदी व  इतर पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल व बुके देऊन सन्मान करण्यात आला.



 सर्व मतदारांचे आभार मानताना आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष जी.के. थोरात यांनी येणाऱ्या काळामध्ये संघटना बळकट करण्यावर भर दिला जाणारा असून सर्व प्रकारच्या शिक्षकांचे व शाळांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील असे आश्वासन दिले. तसेच टीडीएफचा राज्यभर प्रचार व प्रसार करणार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी नरसु पाटील के.एस ढोमसे नानासाहेब फुंदे यांनी सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले.



  यावेळी  निवडणूक प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबवल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजीराव कामथे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले व सदर निवडणुकीसाठी शाळा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्राचार्य राज मुजावर यांचे संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ व बुके देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी पुणे, मुंबई, नाशिक विभागातील तसेच राज्यातील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   नवनिर्वाचित पंचवार्षिक कार्यकारणी पुढील प्रमाणे
1) जी.के. थोरात अध्यक्ष ( पुणे)
2) नरसु पाटील कार्याध्यक्ष (कोकण)
3) नानासाहेब फुंदे उपाध्यक्ष (मुंबई)
4) आर. एच.बाविस्कर उपाध्यक्ष (जळगाव)
5) के एस.ढोमसे कार्यवाह (पुणे)
6) निशांत रंधे खजिनदार (धुळे)
7) रोहित जाधव सहसचिव (कोकण) 
8) सौ. ज्योती नेटवटे सहखजिनदार (मुंबई)
9) मुकुंद साळुंके सदस्य (सोलापूर)
10) एन.डी. नांद्रे सदस्य (धुळे)
11) रमेश म्हात्रे सदस्य (कोकण)


स्वीकृत सदस्य

1) अर्चना जमाले (सोलापूर)
2) मनोज शिरसाट (नाशिक)
 3) अजय शिंदे (कोकण)
 4) मंगला चव्हाण( मुंबई)

बातमी व जाहिरातीसाठी
डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो. 8208185037

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश