स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता या उपक्रमाचे आयोजन




वडगाव मावळ  दि. २ (प्रतिनिधी)
केंद्र सरकार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व बीबीए महाविद्यालय वडगाव मावळ येथे शैक्षणिक वर्ष 2024- 25 मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत स्वभाव स्वच्छता- संस्कार स्वच्छता हा उपक्रम दिनांक 30/09/2024 रोजी राबवण्यात आला.
       या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी स्वयंसेवक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक संस्थेचा परिसर, स्वच्छता प्रभातफेरी, वडगाव नगरीतील ग्रामदैवत पोटोबा मंदिर या धार्मिक स्थळाच्या परिसरातील स्वच्छता केली.
   या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध अनावश्यक प्लास्टिक गोळा केला, परिसरातील केरकचरा, पालापाचोळा झाडून गोळा केला, स्वच्छतेची घोषवाक्य देण्यात आली, या मोहिमेमध्ये सर्व विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांनी स्वच्छतेची शपथ घेतली.
 सदर उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयाचे मा. प्राचार्य अशोक गायकवाड सरांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी, उपक्रमाविषयी माहिती दिली तसेच सामाजिक स्वच्छतेबरोबरच प्रत्येक व्यक्तीने आपल्या व्यक्तीमनाची वैचारिक स्वच्छता करणे ही प्रत्येकाची सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे असे मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सहा. प्रा. रोहिणी चंदनशिवे तसेच सर्व सहकारी प्राध्यापक वर्ग, प्राध्यापकेतर कर्मचारी व विध्यार्थी बहुसंख्यनेउपस्थित होते.शेवटी विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला आणि कार्यक्रमाची सांगता झाली.


बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037

Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास