तळेगाव दाभाडे दि. 21 श्री चौराई देवी मंदिर, सोमाटणे येथे नवरात्र निमित्य मोठ्या प्रमाणात भाविक भेट देतात. तसेच सुदृढ आरोग्यासाठी जागृत नागरिक नियमितपणे व्यायाम म्हणून येतात.
डोंगर माथ्यावर दाट झाडीत असणाऱ्या या मंदिरास भेट द्यायला येणाऱ्या लोकांनी मार्गावर बराचसा प्लॅस्टिक कचरा फेकून दिलेला दिसला. कचरा कुंडी असून सुध्धा कचरा वाटेल तिकडे फेकून दिलेला होता. पाण्याच्या आणि शीत पेयाच्या प्लास्टिक बाटल्या, स्नॅक्सची पाकिटे, बिस्कीट, चॉकलेट ची कवर्स , लहान मुलाचे डायपर्स असा वाटेवर फेकून दिलेला असा हा कचरा ट्रेकिंग पलटनच्या सदस्यांनी पायथ्याशी कचरा कुंडीत जमा केला.
ट्रेकिंग पलटन चे विलास करपे, ज्ञानेश्र्वर पुरी, महेश केंद्रे, संदीप सातपुते आणि डॉ. सुरेश इसावे यानी योगदान दिले. जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांनी सुद्धा हातभार लावला. ट्रेकिंग पलटनची ही १११ वी मोहीम होती.
बातमी व जाहिरात संपर्क
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो. 8208185037
Comments
Post a Comment