शिवजयंती निमित्त सलग सहाव्या वर्षी ट्रेकिंग पलटनची सिंहगडावर स्वच्छता मोहीम

 

पुणे दि.२३ (प्रतिनिधी) ट्रेकिंग पलटनच्या सदस्यांनी 23 फेब्रुवारी 2025 रोजी सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना दिली.  सूर्योदयापासून दुपारी 11 वाजेपर्यंत गडाच्या पार्किंग, घाटजोड रस्ता, पुणे दरवाजा, घोड्यांची पागा, तानाजी कडा या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून अवघड जागी आणि डोंगर उतारावर टाकून दिलेला कचरा गोळा केला. शिवजयंती निमित्त गड स्वच्छता करण्याची ही सलग सहावे वर्ष आहे.

गडाला भेट देणाऱ्या पर्यटकांनी गडाच्या उतारावर फेकून दिलेल्या प्लास्टिक बाटल्या, वेफर्स पॅकेट्स, दारूच्या बाटल्या असा दहा बारा पोती कचरा जमा करण्यात आला. 


या मोहिमेत ट्रेकिंग पलटन चे संदीप चौधरी, अमोल गोरे, श्रीरंग गोरसे, कुमार खुंटे, ज्ञानेश्वर पुरी, अजय खडके, अविनाश ठाकरे, संदीप सातपुते, अक्षय मरसकोल्हे, भूषण लेंडे, ज्ञानेश्वर विळेकर आणि डॉ. सुरेश इसावे यांनी सहभाग घेतला. लहान मुलांमध्ये अद्विका चौधरी (वय 9 वर्षे) आणि वीरांश चौधरी (वय 5 वर्षे) यांचाही सहभाग लक्षणीय ठरला. किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांनी किल्ल्यावर कचरा टाकू नये व किल्ल्याची स्वच्छता राखणे हे आपले कर्तव्य आहे असे आवाहन ट्रेकिंग पलटन पुणे यांच्यावतीने करण्यात आले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay




Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास