स्वा. सावरकर प्रतिष्ठानच्या वतीने स्वा. सावरकर पुण्यतिथी साजरी

तळेगाव दाभाडे दि. २८ (प्रतिनिधी) तळेगाव येथील स्वा. सावरकर प्रतिष्ठानच्या वतीने स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या ५९ व्या पुण्यतिथीनिमित्त मावळ तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी इ. ५ वी ते ७ वी साठी "क्रांतीकारक सावरकर", इ. ८ वी ते १० वी साठी "विज्ञाननिष्ठ सावरकर / समाजसुधारक सावरकर", तर खुल्या गटासाठी "हिंदुत्व व सावरकर" या विषयांचा समावेश होता.

स्पर्धेमध्ये २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बक्षीस वितरण सोहळा व स्वा. सावरकर यांच्या कार्यावर व्याख्यान कडोलकर कॉलनी येथील स्वा. सावरकर गुरुकुल येथे पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सभापती अशोक काळोखे होते, तर मुख्य वक्ते म्हणून प्रसिद्ध साहित्यिक श्रीकृष्ण पुरंदरे उपस्थित होते.


यावेळी बोलताना पुरंदरे म्हणाले, "सावरकर हे थोर क्रांतीकारक आणि समाजसुधारक होते. इंग्रजांनी चाफेकर बंधूंना फाशी दिल्यानंतर अवघ्या १३-१४ व्या वर्षी सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची शपथ घेतली. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी मातृभूमीच्या सेवेसाठी संघर्ष केला."

अशोक काळोखे यांनी सांगितले, "विद्यार्थ्यांनी क्रांतीकारकांचा अभ्यास करून त्यांच्या आदर्श गुणांचे अनुसरण करावे. सावरकरांसारखे विज्ञाननिष्ठ, साहित्यक्षेत्रातील योगदान देणारे आणि देशभक्त नागरिक घडविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे." त्यांनी सावरकर गुरुकुलासाठी आर्थिक मदत जाहीर केली.

सावरकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलास भेगडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, "देशभक्तांचा इतिहास आणि क्रांतीकारकांचे बलिदान नवीन पिढीला समजणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रतिष्ठान विविध उपक्रम राबवत असते."

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दर्शन गुंड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश दाभाडे, खजिनदार संजय जाधव, सदस्य भास्कर भेगडे, अविनाश कुरणे, उदय गाडे, अनिल नाटे, राजेंद्र काळोखे, प्रकाश लोणकर, सतीश राऊत, हिम्मत पुरोहित, अतुल रेडे व विठ्ठल कदम यांनी विशेष मेहनत घेतली.


निबंध स्पर्धेतील विजेते
लहान गट (इ. ५ वी ते ७ वी)
प्रथम क्रमांक: कु. पूजा सचिन शिंदे (आदर्श विद्या मंदिर, तळेगाव)
द्वितीय क्रमांक: तुषार भाउसाहेब केदार (प्रगती विद्या मंदिर, इंदोरी)
तृतीय क्रमांक: सोहम चंद्रकांत बोरसे (सरस्वती विद्या मंदिर, तळेगाव)

मोठा गट (इ. ८ वी ते १० वी)
प्रथम क्रमांक: कु. दर्शन कृष्णा कुंभार (आंड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर, तळेगाव)
द्वितीय क्रमांक: कु. वेदिका लक्ष्मण ढेबे (एकविरा विद्या मंदिर, कार्ला)
तृतीय क्रमांक: कु. वंश धनंजय घोडके (नवीन समर्थ विद्यालय, तळेगाव)

खुला गट
प्रथम क्रमांक: सौ. अर्चना रघुनाथ आपटीकर (तळेगाव स्टेशन)

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास समजण्यास मदत होईल, तसेच स्वा. सावरकरांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचतील, असे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास