एम्प्रॉस युनायटेड लीग कबड्डी, खो-खो, फुटबॉल, क्रिकेट स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
फोटो ओळ- फुटबॉल स्पर्धेतील एम्प्रॉस इंटरनॅशनल स्कूलच्या विजेत्या संघास पारितोषिक प्रदान करताना डॉ. सीतालक्ष्मी अय्यर आणि प्राचार्य डॉ. आय. ए. शेख.
तळेगाव दाभाडे दि. 27 (प्रतिनिधी) तळेगाव दाभाडे येथे झालेल्या जिल्हास्तरीय एम्प्रॉस युनायटेड लीग कबड्डी, खो-खो, फुटबॉल आणि क्रिकेट स्पर्धांमध्ये 18 शाळांच्या क्रीडासंघांनी भाग घेतला. क्रीडास्पर्धेत गटनिहाय बेस्ट कबड्डीपटू म्हणून विक्रम बोगाटी(तळेगाव दाभाडे), सम्यक कदम(कामशेत), अदिती पटेल (चाकण) यांनी बाजी मारली. 12 वर्षे वयोगटातील खो-खो स्पर्धेत तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या संत ज्ञानेश्वर शाळेच्या संघाने तर 14 वर्षे वयोगटात इंदोरीच्या प्रगती विद्यालयाच्या संघाने विजेतेपद पटकावले. फुटबॉलच्या अंतिम सामन्यात एम्प्रॉस इंटरनॅशनल स्कुलच्या पवन नायरने सर्वाधिक गोल करुन संघाला विजेतेपद मिळवून दिले. हिंजवडीच्या ब्लूमिंग स्कूलची आंचल मोरे ही बेस्ट फूटबॉल प्लेअर ठरली. फुटबॉल कोच मनोज स्वामी यांनी तिचे अभिनंदन केले. क्रिकेटमध्ये एम्प्रॉस स्कुलच्या संघ विजेता ठरला. एएसएम एज्युकेशन कॅम्पसच्या शालेय संचालिका डॉ. सीतालक्ष्मी अय्यर आणि प्राचार्य डॉ. आय. ए. शेख यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
*क्रीडा स्पर्धा निकाल याप्रमाणे:-*
· कबड्डी (वयोगट 12 मुले):- प्रथम क्रमांक- स्वामी विवेकानंद स्कूल (तळेगाव दाभाडे); द्वितीय- जीजस क्राईस्ट इंग्लिश स्कूल (कामशेत); सर्वोत्कृष्ट खेळाडू- विक्रम बोगाटी (स्वामी विवेकानंद स्कूल)
· कबड्डी (वयोगट 14 मुले): प्रथम क्रमांक- जैन इंग्लिश स्कूल (कामशेत); द्वितीय-सिद्धांत इंटरनॅशनल स्कूल (सुदुंबरे); सर्वोत्कृष्ट खेळाडू- सम्यक कदम जैन इंग्लिश स्कूल
· कबड्डी (वयोगट 14 मुली): प्रथम क्रमांक- द्वारका स्कूल (चाकण); द्वितीय- ज्ञानप्रबोधिनी स्कूल (शिरगाव); सर्वोत्कृष्ट खेळाडू- अदिती पटेल (द्वारका स्कूल)
· खो-खो (वयोगट 12 मुले): प्रथम क्रमांक- संत ज्ञानेश्वर शाळा (तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण मंडळ); द्वितीय- सिद्धांत इंटरनॅशनल स्कूल (सुदुंबरे); सर्वोत्कृष्ट खेळाडू- सार्थक खंबायत (संत ज्ञानेश्वर शाळा)
· खो-खो (वयोगट 14 मुले): प्रथम क्रमांक- प्रगती विद्यालय (इंदोरी); द्वितीय- अभिषेक विद्यालय (चिंचवड); सर्वोत्कृष्ट खेळाडू- गणेश दिवटे, प्रगती विद्यालय
· खो-खो (वयोगट 14 मुली): प्रथम क्रमांक- संत जिजाबाई कन्या शाळा (देहूगाव); द्वितीय- अभिषेक विद्यालय (चिंचवड); सर्वोत्कृष्ट खेळाडू- समृद्धी पवार, संत जिजाबाई कन्याशाळा
· फुटबॉल (वयोगट 12 मुले): प्रथम क्रमांक- एम्प्रॉस इंटरनॅशनल स्कूल, तळेगाव दाभाडे
· फुटबॉल (वयोगट 14 मुले): प्रथम क्रमांक- एम्प्रॉस इंटरनॅशनल स्कूल, तळेगाव दाभाडे द्वितीय- मामासाहेब खांडगे इंग्लिश स्कूल, तळेगाव दाभाडे; सर्वोत्कृष्ट खेळाडू- पवन नायर, एम्प्रॉस इंटरनॅशनल स्कूल
· फुटबॉल (वयोगट 14 मुली): प्रथम क्रमांक- ब्लूमिंग स्कूल (गहूंजे ); द्वितीय- एम्प्रॉस इंटरनॅशनल स्कूल, तळेगाव दाभाडे; सर्वोत्कृष्ट खेळाडू- आंचल मोरे (ब्लूमिंग स्कूल)
· क्रिकेट (वयोगट 14 मुले): प्रथम क्रमांक- सिद्धांत इंटरनॅशनल स्कूल (सुदुंबरे); द्वितीय जीजस क्राईस्ट इंग्लिश स्कूल (कामशेत); सर्वोत्कृष्ट खेळाडू- आर्यन बोत्रे (सिद्धांत स्कूल)
· क्रिकेट (वयोगट 14 मुली): प्रथम क्रमांक- एम्प्रॉस इंटरनॅशनल स्कूल, तळेगाव दाभाडे
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037
महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.
Comments
Post a Comment