छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर – डॉ. नरेंद्र देशमुख

 

लोणावळा दि. २७ (प्रतिनिधी) मराठी भाषेचा इतिहास दोन ते अडीच हजार वर्षांचा आहे. संतापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत मराठी भाषेत मोठ्या प्रमाणात ग्रंथ निर्मिती झाली आहे. छत्रपती शिवजी महाराजांनी राज्यकारभरात मराठी भाषेला अग्रक्रम दिला आहे. असे मत लोणावळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी व्यक्त केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त लोणावळा महाविद्यालयाचा मराठी विभाग, ग्रंथालय विभाग, सांस्कृतिक विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने ग्रंथदिंडी व मराठी स्वाक्षरी मोहीम या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लोणावळा शिक्षण संस्थेचे विश्वस्त मा. सुनील ठोंबरे यांच्या शुभहस्ते ग्रंथदिंडीचे पूजन व शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर लोणावळा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते नारायणभाऊ पाळेकर, परीक्षा विभागप्रमुख आणि मराठी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र देवरे, डॉ. धनराज पाटील, ग्रंथालयाच्या चांगुणा ठाकर, प्रा. भक्ती अहीर, डॉ. अमर काटकर, डॉ. नितीन बोडके, डॉ. संदीप सोनटक्के, प्रा. भारती देशमुख, प्रा. अनी वर्गीस, डॉ. रंजुबाला चोपडा, प्रा. योगिता मोरे, डॉ. श्रीकांत होगले, वलवण गावचे पोलीस पाटील मा. अर्चना देशमुख, ग्रामस्थ मा.विलास इंगुळकर, मा. दीपक राक्षे, मा. उल्हास पाळेकर उपस्थित होते. 


डॉ. देशमुख म्हणाले, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान मोलाचे आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने विस्तार करण्याचे काम केले आहे. सर्व संतानी मराठी भाषेतून ग्रंथनिर्मिती करून येथील समाजाचे एकप्रकारे प्रबोधन करण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराजांनीही मराठी भाषेला आपल्या राज्यकारभारात राज्यकारभाराची भाषा म्हणून मान्यता दिली होती. आज याच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. यापुढे शिक्षण क्षेत्रातील सर्व विद्याशाखामध्ये मराठी भाषेचा वापर वाढणार आहे. याचा फायदा आपल्या मराठी भाषकांना जास्तीत होणार आहे. 



ग्रामस्थांच्या वतीने मा. नारायणभाऊ पाळेकर यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी डॉ. संदीप पोकळे,   प्रा. संदीप लबडे, डॉ. पवन शिनगारे, डॉ. मल्हारी नागटिळक, डॉ.दीपक कदम ,प्रा. संजय साळुंखे, प्रा. रोहन वर्तक, प्रा. गणेश आखाडे, प्रा. अमोल नवघिरे, प्रा. समीर गायकवाड, प्रा. पल्लवी तिखे, तेजस भांगरे, राकेश साळुंखे, रवींद्र उंबरे तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा. प्रा. संतोष शिंदे यांनी केले. डॉ. धनराज पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा. संदीप खाडे यांनी केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास