मराठी राजभाषा दिन ॲड.पु.वा.परांजपे विद्यामंदिरामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न

  तळेगाव दाभाडे दि.२७ (प्रतिनिधी) मराठी राजभाषा दिन ॲड.पु.वा.परांजपे विद्यामंदिरामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चे माजी अध्यक्ष डॉ. शाळिग्राम भंडारी व्याख्याते तसेच, नूमविप्र मंडळाचे सदस्य महेश भाई शहा, मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, पर्यवेक्षिका रेखा भेगडे तसेच सर्व ज्येष्ठ अध्यापक यांनी ग्रंथदिंडीचे, कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे व सरस्वतीचे पूजन आपल्या शुभहस्ते केले.


शालेय परिसरात या निमित्ताने ग्रंथदिंडीची पालखी काढण्यात आली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याचे औचित्य साधत यावर्षी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी  बालगीत, शिवरायांचा पोवाडा ,अभंग, अनामवीरा ही कुसुमाग्रजांची कविता तसेच, माणसाने जगावे कसे, माय मराठी तुझ्यासाठी , श्रीकृष्णाची गवळण , भारुड, महाराष्ट्रातील लोककला, अहिराणी भाषेची नाटिका, ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी , गौरव महाराष्ट्राचा ,लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असा विविध लोककलांच्या माध्यमातून मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याचा संदेश दिला.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगून केले.यानिमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॕ.शालिग्राम भंडारी व्याख्याते यांनी विद्यार्थ्यांनी जीवन जगत असताना मस्त जीवन जगावे ,आपला चेहरा नेहमी प्रसन्न ठेवावा.तसेच,आपली वाणी ही दुसऱ्यांना आनंद देईल अशी असायला हवी. पुढे पुढे जात असताना मागेही वळून पाहणे गरजेचं असतं हे आपल्या मनोगतातून सांगितलं. कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेचे माजी विद्यार्थी व नूमविप्रमंडळाचे ज्येष्ठ संचालक महेशभाई शहा यांनी देखील विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व अध्यापकांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता नागपुरे यांनी तर आभार पर्यवेक्षिका रेखा भेगडे यांनी केले.  संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील अध्यापिका सुवर्णा काळडोके, सुजाता कातोरे, प्रभा काळे, गायञी जगताप,स्वाती तांबिरे, प्रिया कांबळे या सर्व अध्यापकांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.

Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास