विद्यार्थी विकास आणि सामाजिक उन्नतीचा ध्यास असलेली खडकी शिक्षण संस्था - चद्रकांत दादा पाटील

 


फोटो: डावीकडून रमेश अवस्थे, संजय चाकणे, ज्ञानेश्वर मुरकुटे,आनंद छाजेड, राजेश पांडे, कृष्णकुमार गोयल, चंद्रकांत दादा पाटील, बागेश्रीताई मंठाळकर, ऋतुजा पायगुडे

पुणे दि.26 (प्रतिनिधी) महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड यास कडून खडकी शिक्षण संस्थेस प्राप्त झालेल्या बस लोकार्पण सोहळा समारंभात ते बोलत होते.



खडकी शिक्षण संस्थेमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये जाण्या येण्याच्या अडचणी लक्षात घेऊन MNGL कडून बस देण्यात आली या बसचा लोकार्पण समारंभ आज *उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना .चंद्रकांत दादा पाटील* यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.. याप्रसंगी बोलताना पुढे ते म्हणाले विद्यार्थ्यांच्या विकासा करिता सरकारने अनेक ठोस पावले उचलली असून मुलींचे शैक्षणिक प्रमाण वाढवण्याच्या हेतूने इंजीनियरिंग... वैद्यकीय सारख्या कोर्सेस मध्ये फी मध्ये सवलत देण्यात आलेली आहे ... खडकी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सदैव तत्पर असून भविष्यामध्ये लागणाऱ्या इतर सोयी सुविधांसाठी मी सदैव तयार आहे असेही ते म्हणाले.



संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नती मध्ये संस्था सदैव अग्रस्थानी असून कोणत्याही अडचणीमुळे त्यांनी आपले शिक्षण थांबवू नये या हेतूने शाळेमध्ये येण्या जाण्याकरिता विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता संस्थेने तात्काळ पावले उचलली आणि एम एन जी एल च्या माध्यमातून आज संस्थेस बस मिळालेली आहे.. या उपक्रमामध्ये सहभागी सर्वांचे त्यांनी आभार मानले.



याप्रसंगी पुस्तक न्यासाचे संचालक राजेश पांडे व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर, एम एनजी एल चे , ऋतुजा पायगुडे, केसीबी उपाध्यक्ष अभय सावंत, सचिव आनंद छाजेड,  अजय सूर्यवंशी,  रमेश अवस्थी, ज्ञानेश्वर मुरकुटे, सुधीर फेंगसे कमलेश पंगूडवाले राजेंद्र भुतडा, काशिनाथ देवधर संजय चाकणे तथा संस्थेतील सर्व विभागाचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुग्रीव सावंत यांनी तर आभार प्रदर्शन श्री आनंद छाजेड यांनी व्यक्त केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास