श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले-गणेश काकडे

 

 तळेगाव दाभाडे दि. १८ (प्रतिनिधी) सोमवारी(१७)  तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, उद्योजक गणेश काकडे यांच्या मार्गदर्शना नुसार जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने  छत्रपती  शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंती साजरी केली.या निमित्त पोवाडे,मर्दानी खेळ,आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.गणेश बोरगे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

यावेळी छावा चित्रपट  दाखविण्यात आला.यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.श्री गणेश काकडे यांचे हस्ते  छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.यावेळी महाआरती करण्यात आली.  या कार्यक्रमासाठी जाणता राजा प्रतिष्ठानचे नरेंद्र डुबल,अनिल वेदपाठक आदी पदाधिकारी  सदस्य तसेच माजी नगरसेवक रोहीत लांघे ,नितीन दाभाडेउपस्थित होते. तसेच परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन देखील मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. 


तसेच जय गणेश मित्र मंडळ सत्यकमल कॉलनी तळेगाव दाभाडे स्टेशन या ठिकाणी देखील शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या ठिकाणी देखील शिवज्योत आगमन, श्रींची आरती, तसेच जय गणेश ढोल ताशा पथक ओझर्डे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लकी ड्रॉ विजेत्या महिलेस श्री गणेश काकडे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.


 त्याचप्रमाणे नवचैतन्य उत्सव मंडळ आनंद वनश्रीनगर या ठिकाणी देखील शिवजन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास