इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेत 'योग दिन' उत्साहात साजरा

 

तळेगाव दाभाडे दि. २१ (प्रतिनिधी) इंद्रायणी विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या वतीने इंद्रायणी महाविद्यालय कृष्णराव भेगडे फार्मसी कॉलेज तसेच यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आज २१ जून ' आंतरराष्ट्रीय योग दिना'चे औचित्य साधून कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. 


         याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.संभाजी मलघे, उपप्राचार्य एस.पी.भोसले, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आरोटे,
श्री. गोरख काकडे, प्रा.आर.आर डोके यांनी योगाचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या. यावेळी पर्यवेक्षिका प्रा.यु.एस.दिसले, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.यु.एस.खाडप,  वाणिज्य विभाग प्रमुख प्रा विणा भेगडे, कला विभाग प्रमुख प्रा.के.डी जाधव, तंत्र शिक्षण विभाग प्रमुख प्रा.एन.टी.भोसले, प्रा. योगेश घोडके उपस्थित होते.


         याप्रसंगी प्रा.जगताप यांनी विद्यार्थ्यांना योगा बद्दलची प्राथमिक माहिती देऊन सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये योग आपल्याला शारीरिक व मानसिक दृष्ट्या कशा प्रकारे सुदृढ ठेवतो याचे महत्त्व पटवून दिले. रोज योग केल्याने आपल्या विचारांमध्ये होणारा सकारात्मक बदल हा आपल्या उद्यासाठी खूप महत्त्वाचा असतो हे त्यांनी सांगितले. याचबरोबर उपस्थित सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांना योगप्रात्यक्षिकामध्ये सहभागी करून योगाची प्रात्यक्षिके केली. सर्वांनी उत्साहाने यात सहभाग घेतला.



      याप्रसंगी योगशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या प्रा. तेजस दिवसे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


        योग हा फक्त भारतापुरताच मर्यादित न राहता आज संपूर्ण जगाला आरोग्याचे महत्त्व पटवून देतो ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांमध्ये उद्याच्या आव्हानाला पेलण्याचे मनोबल निर्माण व्हावे यासाठी संस्थेचे मान्यवर नेहमीच प्रयत्नशील असतात. इंद्रायणी विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. रामदासजी काकडे साहेब व कार्यवाह चंद्रकांतजी शेटे साहेब यांनी योग दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देऊन शुभेच्छा दिल्या.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर