Posts

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा व वंदे मातरम सामाजिक संस्थेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त पेनुर येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

Image
 भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा व वंदे मातरम सामाजिक संस्थेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त पेनुर येथे  भव्य रक्तदान  शिबिर संपन्न (प्रतिनिधी) दि २५ भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा व वंदे मातरम सामाजिक संस्थेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 21/08/2023 रोजी पेनुर येथे  भव्य रक्तदान  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पो. नि. श्री. संभाजीराजे गायकवाड, डॉ. स्वामी गुरुजी, अक्षय ब्लड बँकेचे प्रतिनिधी श्री. सागर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.             मागील 20 वर्षापासून या संस्थेच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. सालाबाद प्रमाणे संस्थेने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरास यावर्षीही पेनुर व पेनुर परिसरातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या सहभाग नोंदवला. यावर्षी संस्थेने केलेल्या आव्हानास 161 रक्तदात्यांनी रक्तदान करुन भरभरून प्रतिसाद दिला. यातील गौरवपूर्ण बाब म्हणजे 5 जोडप्यांनीही रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला. या सर्व रक्तदात्यांचा उचित असा सन्म...

इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे हरकचंद रायचंद बाफना डीएड कॉलेज मध्ये डीएड डिग्री घेणाऱ्या मुलींना टीचर ट्रेनिंग संपन्न

Image
इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे हरकचंद रायचंद बाफना डीएड कॉलेज मध्ये  डीएड डिग्री घेणाऱ्या मुलींना टीचर ट्रेनिंग संपन्न तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) दि. २३ ऑगस्ट, इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडेने आजच्या विद्याथ्यांसमोरील नवनवीन आव्हानांना शिक्षकांनी कसे तोंड द्यावे या विषयाला अनुसरून हा परिसंवाद प्रेसिडेंट संध्या थोरात यांनी घडवून आणला. कॉलेजचे  प्रिंसिपल हिरामण लंघे सरांनी या परिसंवाद  साधण्यास मान्यता दिली. यावेळी बाफना कॉलेजच्या शीतल गवई, शुभांगी हेंद्रे या शिक्षिका उपस्थित होत्या.  त्यांनी प्रेसिडेंट संध्या थोरात, सेक्रेटरी निशा पवार प्रकल्प प्रमुख डॉ विनया केसकर तसेच माजी प्रेसिडेंट प्रवीण साठे, सभासद् कोमल सूर्यवंशी यांचा सत्कार केला.  डॉ. विनया केसकर यांनी D.Ed  कॉलेजच्या विद्यार्थिनींना  मार्गदर्शन करताना अगदी मूलभूत प्रश्नांना हात घालून त्यांना बोलते केले. अगदी KG to PG पर्यंतच्या  विद्यार्थ्यांना कोणत्या समस्या भेडसावतात, त्यांच्यासमोर काय आव्हाने आहेत? या विद्यार्थ्यांना आपण कशी मदत करू शकतो? यावर उहापोह केला. मुलांमध्ये होणारे हार्म...

इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडे तर्फे रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थिनींना डॉ विनया केसकर यांचे अनमोल मार्गदर्शन

Image
इनरव्हील क्लब ऑफ तळेगांव दाभाडे तर्फे रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थिनींना डॉ विनया केसकर यांचे अनमोल मार्गदर्शन तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) दि.०७ ऑगस्ट, २१व्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यासाठी जीवन कौशल्यांचा वापर करून सर्वांगीण विकास कसा साध्य करावा, याबद्दल डॉ विनया केसकर यांनी रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेतील  इयत्ता ९ वी व १०वी तील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. इनरव्हील क्लब, तळेगांव दाभाडेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. समस्या निर्माण झाल्यानंतर, मानसिक ताण आल्यानंतर तो कमी करण्यापेक्षा तो ताण निर्माण होऊच नये यासाठी काय काळजी घ्यावी, त्यासाठी कोणती जीवन कौशल्ये अंगीकृत करावीत, स्वतःचा शोध घेऊन आपल्या क्षमतांचा विकास कसा करावा, स्वजाणिवा समृद्ध कशा कराव्यात याची शिदोरी अगदी सहज सोप्या, ओघवत्या शब्दात त्यांनी मुलींना दिली. विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्यांनी त्यांनाही बोलते केले. स्वतःची ओळख कशी आत्मविश्वासाने करून द्यावी, स्वतःमधील गुण दोष ओळखून गुणात्मक दर्जा कसा वाढवावा याची जाणीव विद्यार्थिनींना करून दिली. क्लब प्रेसिडेंट संध्या थोरात यांनी या स्...

विकास अधिकारी शिवाजी पाटील यांच्या टीमचे विमा व्यवसायात उत्तुंग यश

Image
  विकास अधिकारी शिवाजी पाटील यांच्या टीमचे विमा व्यवसायात उत्तुंग यश तळेगाव स्टेशन (वार्ताहर) दि १६ एल आय सी कार्यालय  तळेगांव दाभाडे येथे कार्यरत असणारे प्रतिथयश विकास अधिकारी (वर्ग 2) श्री शिवाजी पाटील ह्यांच्या टीमची युनिट मिटिंग दिनांक 16 ऑगस्ट ला मोठ्या उत्साहात संपन्न झाली.गेल्या आर्थिक वर्षात शिवाजी पाटील ह्यांच्या टीमने लोनावळा-तळेगांव शाखेमध्ये सर्वात प्रथम सहस्त्रविर विकास अधिकारी होण्याचा मान मिळवला असून शाखेमध्ये बऱ्याच वर्षानंतर ही किमया साधल्या गेली आहे.तसेच श्री शिवाजी पाटील ह्यांना उत्तम कामगिरी च्या जोरावर एल आय सी ने एस बि ए ही मानाची पदवी दिली आहे. शिवाजी पाटील ह्यांनी प्रशिक्षित केलेल्या एजंट्सपैकी पाच एजंट्सनी ,एकूण आठ वेळा ते ही गेल्या तीन च वर्षात आतंरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत मानाचा समजला जाणारा MDRT हा किताब जिंकलेला आहे.त्याकरिता विकास अधिकारी श्री शिवाजी पाटील आणि त्यांच्या टीमचे विमा क्षेत्रात विशेष कौतुक होत आहे. ह्या सर्व बाबींचे एकत्रित यश साजरे करण्यासाठी आणि पुढील व्यवसायाचे नियोजन करण्यासाठी लोनावळा शाखेचे शाखाधिकारी श्री बेडसे साहेब आणि तळेगां...

व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी लोणावळा महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

Image
व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी लोणावळा महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्यदिन साजरा लोणावळा (प्रतिनिधी) दि. १५ व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी लोणावळा महाविद्यालयामध्ये दरवर्षी प्रमाणे 15 ऑगस्ट 2023 रोजी देशाचे 76 वे स्वतंत्र्य वर्ष साजरे करण्यात आले. या वेळी ध्वजारोहणाचा मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अशोक ठाकूर यांना देण्यात आला. या कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे  विभाग  प्रमुख डॉ. हरिश हरसुरकर, प्रा.प्राणेश चौहान, प्रा.सोनी राघो, प्रा.मनीषा कचरे व प्रा. हुसेन शेख, रोहित जगताप, प्रा.रश्मी भुंबरे, प्रा.पूनम पोफळकर, प्रा.श्रुती सुखधान,प्रा.तनुजा हुलावळे, प्रा.मुबीन खान, पराग मराठे ,स्नेहल कुटे, नंदू ठाकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

एमआयटी बी.एड्. महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल

Image
एमआयटी बी.एड्. महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल आळंदी (प्रतिनिधी ) दि २९ सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या जून 2023 मध्ये घेतलेल्या शिक्षणशास्त्र  पदवी (बी.एड्. )परीक्षेत आळंदी येथील माईर्स ,एम.आय.टी. संत ज्ञानेश्वर बी. एड्.महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला . महाविद्यालयातील विद्यार्थिनी सुवर्णा म्हस्के (८२.९० टक्के )यांनी प्रथम क्रमांक पटकाविला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ यांनी दिली .  दोन ते पाच क्रमांक मिळवणारे अनुक्रमे विद्यार्थी ,शितल शेंडे ( ८२.७५%), राजेश्वर पाखरे ( ८२.५०%), प्रणाली सोनवणे ( ८१.९० %), प्रियांका भावे ( ८१.२५ %) प्राचार्य डॉ. सुरेंद्र हेरकळ, डॉ. प्रतिभा दाभाडे, प्रा. अंगद जावळे, डॉ. गंगोत्री रोकडे, डॉ. विकास तुपसुंदर , डॉ. शिल्पा गावंडे , प्रा. संजय शिंदे,  प्रा. दर्शना पवार , प्रा. शेखर क्षीरसागर , प्रा. दिशा ठाकूर , प्रा. संदीप गाडीलकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले . संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले . महाविद्यालयाच्या वतीने बी.एड्. हा अभ्यासक्रम अत्यंत आधुनिक पद्ध...

खडू फळा वापरून कुलगुरूंनी घेतला NEP चा वर्ग

Image
  खडू फळा वापरून कुलगुरूंनी घेतला NEP चा वर्ग  पुणे  (प्रतिनिधी) दि 21शिक्षण प्रसारक मंडळीच्या टिळक शिक्षण महाविद्यालयातर्फे आयोजित जे पी नाईक व्याख्यानमाला अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉ. श्री संजीवजी सोनवणे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शिक्षक प्रशिक्षणासमोरील आव्हाने या विषयावर दि 20 जुलै 2023 रोजी मार्गदर्शन केले. टिळक शिक्षण महाविद्यालयातर्फे जे पी नाईक व्याख्यानमाला अंतर्गत दर महिन्याच्या 20 तारखेला एका नामवंत शिक्षण तज्ञाचे व्याख्यान ठेवले जाते. दिनांक २० जुलै 2023 रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक चे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर श्री संजीवजी सोनवणे यांचे व्याख्यान टिळक शिक्षण महाविद्यालयाच्या वा. ना. दांडेकर सभागृह आयोजित केले होते. आपल्या व्याख्यानात माननीय कुलगुरूंनी उच्च शिक्षणाचे बदलते स्वरूप शिक्षक प्रशिक्षणासमोरील आव्हाने अकॅडमी क्रेडिट बँक पद्धत पदवी आणि पदव्युत्तर वर्गाची रचना अशा विविध विषयावर पारंपारिक खडू फळाचा उपयोग करून मार्गदर्शन केले. एखाद्या अस्सल शिक्षकांनी तंत्रज्ञान ...

डॉ. सुरेंद्र हेरकळ यांची दोन विद्यापीठांच्या अभ्यास मंडळावर निवड

Image
 डॉ. सुरेंद्र हेरकळ यांची दोन विद्यापीठांच्या अभ्यास मंडळावर निवड  पुणे (प्रतिनिधी) दि १७ माईर्स,एम.आय.टी. संत ज्ञानेश्वर बी. एड्. कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेंद्र चंद्रकांत हेरकळ यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद तसेच,डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठ, पुणे येथील शिक्षणशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर पुढील पाच वर्षांसाठी  नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. सुरेंद्र हेरकळ मागील 18 वर्षापासून शिक्षक शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी विविध विषयांत अशा एकूण 16 पदव्या प्राप्त केल्या आहेत ,9 पुस्तके, 11आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध समित्यांवर ते कार्यरत आहेत. त्यांचे आतापर्यंत 29 शोध निबंध आंतरराष्ट्रीय जरनलमध्ये प्रसिद्ध झालेले असून, 6 विद्यार्थी  पीएचडीचे मार्गदर्शन घेत आहेत.  डॉ. सुरेंद्र हेरकळ शिक्षक-शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान सहाय्यक विविध उपक्रम उत्कृष्ट रित्या राबवित आहेत. सदर निवडीबद्दल संस्था, प्राध्यापक व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील...

सुरेशजी चव्हाणके यांची लोणावळा वैक्स म्युझियम व शिवशाही ऐतिहासिक वस्तू संग्रहालयास सदिच्छा भेट...

Image
 सुरेशजी चव्हाणके यांची लोणावळा वैक्स म्युझियम व शिवशाही ऐतिहासिक वस्तू संग्रहालयास सदिच्छा भेट... तळेगाव स्टेशन (प्रतिनिधी) दि. १३ सुदर्शन न्यूज चॅनलचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरेशजी चव्हाणके यांनी लोणावळा वैक्स म्युझियम आणी शिवशाही ऐतिहासिक वस्तू संग्रहालयास नुकतीच भेट दिली. सदर दौरा नियोजित होता. भेटी दरम्यान ते म्हणाले, "दोन्ही संग्रहालये मागील काही वर्षे पर्यटन विकासात मोलाचे योगदान देत आहेत. समाजाची पर्यटनाची भूक भगवणाऱ्या अशा संग्रहालयांचा झालेला विकास हा लोणावळा शहर आणी मावळ तालुक्याचे भूषण ठरले आहे. मी महाराष्ट्रातील सर्व जनतेला अवाहन करेल की, त्यांनी या पर्यटन नगरीला आणी विशेष गुणवत्तेने उभारल्या गेलेल्या या संग्रहालयांना निश्चितच भेट द्यावी. श्री. राजेंद्र चौहान, श्री. धवल चौहान व डॉ. प्रमोद बोराडे यांच्या मेहेनेतीने लोणावळा शहरातील या पर्यटन स्थळाला अधिकांश लोकांनी भेट दिली तर आपला इतिहास, संस्कृती आणी परंपरा नव्या पिढीला कळतील.  दुर्मिळ वस्तू व शस्रास्र सहज कुठे पहायला मिळत नाही. मात्र येथे शस्राला प्रत्यक्ष हात लावून अभ्यास करण्याची तथा अनुभूती घेण्याची व्यवस्था ...

प्रा. श्री मनोज किसन गायकवाड यांना पीएच. डी. पदवी प्रदान

Image
  प्रा. श्री मनोज किसन गायकवाड यांना पीएच. डी. पदवी प्रदान तळेगाव स्टेशन (वार्ताहर) दि. १० हरकचंद रायचंद बाफना डी. एड. कॉलेजचे प्राध्यापक श्री मनोज किसन गायकवाड यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. मनोज गायकवाड यांनी *"पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे जागतिकीकरणाच्या दृष्टीने व्यष्टी अध्ययन"* या विषयावर शिक्षणशास्त्र व विस्तार विभागातून संशोधन कार्य पूर्ण केले. या संशोधनासाठी त्यांना डॉ. नवनाथ तुपे  यांचे मार्गदर्शन लाभले. मनोज गायकवाड यांनी पीएच. डी. प्राप्त करीत शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च शैक्षणिक पात्रता संपादन केली याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. तुकाराम असवले, सचिव मा. अशोकजी बाफना सो, उपाध्यक्ष मा. बंडोबा मालपाटे यांनी अभिनंदन केले तसेच संस्थेतील सर्व प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर वर्ग, आजी माजी विद्यार्थी यांच्याकडून कौतुक होत आहे.