Posts

शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा: आमदार सत्यजित तांबे

Image
शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवा: आमदार सत्यजित तांबे पुणे (प्रतिनिधी) दि. २५ नाशिक  पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे तसेच टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे शिक्षण आयुक्त मा.सुरज मांढरे यांच्या समवेत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नाविषयी बैठक घेऊन अनेक मुद्द्यावर चर्चा केली. या बैठकीस राज्याचे राज्याचे शिक्षण संचालक मा.कृष्णकांत पाटील, सहसंचालक हारून आतार, एसएससी बोर्डाच्या सचिव अनुराधा ओक,उपसंचालक वाव्हळ मॅडम उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये  प्रामुख्याने खालील विषयावर चर्चा करण्यात आली 1) आधार व्हॅलिडेशन मुदत वाढवण्यात यावी. 2) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रलंबित बिले तात्काळ मार्गी लावण्यात यावी. 3) वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दरवर्षी आयोजीत करण्यात यावे. 3) मागील वर्षी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी शिक्षकांचे दोन हजार रुपये घेतले होते ते माघारी देण्याबाबत चर्चा करण्यात आली. 4) अनुकंपाचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात यावेत. 5) पवित्र पोर्टल द्वारे लवकरात लवकर शिक्षक भरती सुरू करावी. 6) शिक्षकांच्यावर असणाऱ्या शाळाबाह्य कामांचा ताण कमी करावा. त...

प्राचार्य श्री. हरिश्चंद्र गायकवाड सर यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

Image
पुणे (प्रतिनिधी) दि. २३ आज पै. हिरामण बनकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तसेच पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे मा.अध्यक्ष आदरणीय श्री. हरिश्चंद्र गायकवाड  सर यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा शिवशंकर सभागृह, महर्षी नगर पुणे ३७ येथे संपन्न झाला.   या सन्मान सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री. जे.के. पाटील सर होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे शिक्षण संचालक आदरणीय कृष्णकुमार पाटील सर, पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ. सुनंदा वाखारे मॅडम, शिक्षणाधिकारी राक्षे सर, माजी आमदार योगेश टिळेकर, एसएससी बोर्डाच्या माजी सचिव शकुंतला  काळे मॅडम, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मा. नंदकुमार सागर सर , मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव मा. शांताराम पोखरकर सर,चंद्रकांत मोहोळ सर, मा. सचिव अरुण थोरात सर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रसाद गायकवाड सर, शिक्षकेतर महामंडळाचे शिवाजीराव खांडेकर सर, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे पदाधिकारी, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी तसेच शिक्षण खात्य...

संघर्षाचे दुसरे नाव म्हणजे जोतिबा फुले - डॉ. प्रमोद बोराडे

Image
 अध्यापक महाविद्यालयात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी तळेगाव स्टेशन (वार्ताहर) दि.१७ अध्यापक महाविद्यालयात दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव दाभाडे येथील इतिहास प्रमुख व प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे सर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. अनिता धायगुडे ह्या होत्या. डॉ. बोराडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा बालपणा पासून चा जीवनपट उलगडून महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई यांच्या जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. सदर कार्यक्रम हा गुलमोहर गटाचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉ. संदीप गाडेकर व नीलकमळ गटाच्या मार्गदर्शिका प्रा. सोनाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी मोनिका भोपळे हिने विद्यार्थी मनोगत व्यक्त केले. कामाचे अध्यक्ष डॉ. अनिता धायगुडे यांनी महात्मा फुले यांचे कार्य या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमती शिंदे व शुभदा शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्योत्स्ना गुर...

तळेगाव स्टेशन येथे सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ

Image
  तळेगाव स्टेशन येथे सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ तळेगाव स्टेशन (वार्ताहर)  दि.17 यशवंत नगर येथील "भक्ती विहार"   बिल्डिंग मधून श्री.निनाद विरकुड यांच्या मुलीची सायकल Cycle BSA ladybird 17" aquablue colour मध्यरात्री 1. 11 मिनिटांनी 1 अज्ञात इसमाने राजरोस चोरून नेली आहे. चोरटा सी.सी. टीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे, सदरहू तक्रार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आहे. या बिल्डिंग मधील सायकल चोरीची ही  या दोन महिन्यातील दुसरी घटना आहे. श्री. बालाजी मंदिर च्या शेजारी अश्या प्रकारे राजरोस बिल्डिंग आवारातून सायकल चोरीस जाणे हे धोक्याचे लक्षण आहे. उद्या अशाप्रकारे फ्लॅट मध्ये  किंवा इतरही ठिकाणी सुद्धा राजरोस चोऱ्या होऊ शकतात .तरी आशा चोरीच्या घटनांवर वेळीच आळा घालणे सामाजिक  सुरक्षितता व प्रशासन स्तरावर आवश्यक आहे. अशाने तळेगाव दाभाडे चे नाव खराब होत आहे. - श्री. निनाद विरकुड तरी कृपया या घटनेची गंभीर दखल घेऊन  सदरहू इसम जर कोणाला आढळून आला तर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, लोणावळा महाविद्यालयात जागतिक महिला दिन संपन्न

Image
 व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, लोणावळा महाविद्यालयात जागतिक महिला दिन संपन्न तळेगाव स्टेशन (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि. ८ मार्च २०२३ येथील व्ही.पी.एस.कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी , लोणावळा येथे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. सोनी राघो यांनी महिला दिनानिमित्त थोडक्यात मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमावेळी सर्व महिला कर्मचाऱ्यांना पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या व केक कट करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमावेळी प्रा.सोनी राघो, प्रा. प्रीती चोरडे, प्रा. रश्मी भुंबरे, प्रा. मनीषा कचरे, सौ. पूजा साठे, कु. सुप्रिया पेठकर, कु. स्वाती म्हस्के, कु. प्रीतीजा घोलप, आणि सर्व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

अध्यापक महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Image
  अध्यापक महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा तळेगांव स्टेशन(वार्ताहर)  दिनांक 8 मार्च 2023 हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला, सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ. स्मिता धुमाळ , ॲड. अर्चना ढोरे व प्रा.वंदना केमसे होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्मिता धुमाळ यांनी भूषवले त्यांनी आपल्या भाषणात रोजगार संधी आणि कौशल्य उद्योजकता यावर विद्यार्थ्यांना माहिती दिली व वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीच्या संधी कशा उपलब्ध आहेत या विषयक मार्गदर्शन केले,  ॲड. अर्चना ढोरे यांनी आपल्या भाषणात कौटुंबिक अत्याचार व कायदे यावर मार्गदर्शन केले तसेच कौटुंबिक अत्याचार कसे थांबवता येतील त्याला आळा कसा घालता येईल यावर मार्गदर्शन केले, प्रा. वंदना केमसे यांनी स्वसंरक्षण मार्गदर्शन देऊन विद्यार्थ्यांनी आपले संरक्षण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले व कराटे प्रशिक्षण दिले. यावेळी प्रा. महादेव सांगळे, डॉ.कविता तोटे, डॉ. संदीप गाडेकर, डॉ. शीतल देवळालकर, प्रा. सोनाली पाटील ,प्रा. सुजाता जाधव व सर्व बी. एड. व एम.एड. विद्यार्थीनी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रम केतकी गटा...

लक्षवेधी अन्नत्याग व धरणे आंदोलन नवव्या दिवशीही सुरूच

Image
 लक्षवेधी अन्नत्याग व धरणे आंदोलन नवव्या दिवशीही सुरूच मुंबई (संपादक - डॉ.संदीप गाडेकर)  दि.1 मार्च 2023... लढा 100 % अनुदानाचा समान काम, समान वेतन व सन्मानाचा 24 नोव्हेंबर 2001पूर्वीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयास अनुदान प्राप्त व्हावे यासाठी दिनांक २१ फेब्रुवारी पासून लक्षवेधी अन्नत्याग व धरणे आंदोलन प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी असोसिएशनचे ठाणे अध्यक्षा डॉ.मेघा गुळवणी यांच्या मार्गदर्शनाखाली 10 विद्यापीठातील नेतृत्व प्रमुख करण्यासाठी आलेले प्राचार्या डॉ.विद्युलत्ता कोल्हे, प्रा.समिर तहसीलदार मुंबई विद्यापीठ, प्रा. डाॅ.धनंजय वडमारे,भागवत करडकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद  प्रा.डाॅ.रविंद्र पाटील, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, प्रा.डाॅ.सचिन इंगळे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर प्रा.डाॅ.संजय खूपासे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील श्री.संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालयातील प्राचार्या डॉ.अनिता धायगुडे, प्रा.महादेव सांगळे, डॉ.कविता तोटे, डॉ.संदीप गाडेकर...

व्ही. पी. एस. इंजिनिअरिंग कॉलेज, लोणावळा येथील महाविद्यालयात सांस्कृतिक व कला-क्रिडा कार्यक्रमाचे उद्घाटन

Image
 व्ही. पी. एस. इंजिनिअरिंग कॉलेज, लोणावळा येथील महाविद्यालयात सांस्कृतिक व कला-क्रिडा कार्यक्रमाचे उद्घाटन तळेगाव दाभाडे (संपादक - डॉ. संदीप गाडेकर) दि.२७ व्ही. पी. एस. इंजिनिअरिंग कॉलेज, लोणावळा येथील महाविद्यालयात २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सांस्कृतिक व कला-क्रिडा कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये आठवड्याच्या अंतरात होणाऱ्या सांस्कतिक कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. उद्घाटनाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अशोक ठाकूर व इतर विभाग प्रमुख डॉ. हरिश हरसूरकर, प्रा. सोनी राघो व प्रा. प्राणेश चौव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मुर्तीचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आडठवडयामधील विविध होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेशा ठरवली.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गडवाट प्लास्टिक मुक्त

Image
 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गडवाट प्लास्टिक मुक्त पुणे (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) ट्रेकिंग पलटन पुणे ग्रूप तर्फे सलग तिसऱ्या वर्षी शिव जयंती निमित्त १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सिंहगडाची अतकरवाडी ते पुणे दरवाजा ही गडवाट प्लास्टिक मुक्त करण्यात आली.  ट्रेकिंग पलटन गृप ची एकूण  ही ९६ वी मोहीम होती. घोड्यांची पागा, दारूगोळा कोठार, पाण्याची टाकं, पुणे दरवाजा मार्गे उतरत अतकरवाडी पर्यंत ट्रेक करत गडवाट च्या दोन्ही बाजूंना उतारावर पर्यटकांनी फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या, शीतपेय बाटल्या तसेच बिस्कीट, वेफर्स अशा कोरड्या खाऊचे पॅकेट्स गोळा करून पायथ्याशी स्थानिक नागरिकांच्या स्वाधीन केला. असा सुमारे सहा पोती पर्यावरणास घातक कचरा गोळा करण्यात आला. ट्रेकिंग पलटन गृप च्या सदस्यांना कचरा गोळा करताना बघून काही पर्यटकांनी हातभार लावला. काहींनी आभार मानले. काहींनी कौतुक केले.  ट्रेकिंग पलटन गृप गेली सात वर्षे विविध गडावर अशा प्लास्टिक मुक्त अभियान राबवित आली आहे. सुदैवाने हळू हळू प्लास्टिक चे कचऱ्याचे प्रमाण कमी होत चाललेले दिसत आहे. गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी गडवाट वरील...

आंतर अध्यापक विद्यालयीन स्नेहवर्धन कला व क्रीडा स्पर्धेत हरकचंद रायचंद बाफना डी. एड. कॉलेजच्या विद्यार्थिनींचे यश

Image
आंतर अध्यापक विद्यालयीन स्नेहवर्धन कला व क्रीडा  स्पर्धेत हरकचंद रायचंद बाफना डी. एड. कॉलेजच्या विद्यार्थिनींचे यश तळेगाव स्टेशन (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि. 17 कोरोना महामारीनंतर प्रथमच डी.एड.च्या विद्यार्थ्यांच्या कला स्पर्धा पुणे येथे पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये कॉलेजच्या PPT या स्पर्धेत बाफना डी.एड. कॉलेजची विद्यार्थिनी  कु. प्रीती माटे हिने तृतीय क्रमांक आणि लोकनृत्य या  स्पर्धेत विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष तुकाराम आसवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सचिव अशोक बाफना यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य हिरामण लंघे, प्रा.राजेंद्र डोके, प्रा.मनोज गायकवाड, प्रा.शुभांगी हेंद्रे, प्रा. शीतल गवई , प्रा.योगेश जाधव, नंदकिशोर, सोमनाथ धोंगडे  उपस्थित होते.